ग्रंथपाल दिनानिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालयात कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) भारतीय ग्रंथालय शाखाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीदिनी समर्थ नगर येथील शासकीय विभानीय ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्ताने बुधवारी (दि.१२) दुपारी ३ वाजता संवाद बंधमालांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून सहाय्यक ग्रंथालय संचालक संचालक सुनील हुसे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञानोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण उद्घाटक म्हणून उपस्थित राहार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप, विवेकानंद कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. गोवर्धन औटे, जिल्हा ग्रंथालय संघाचे विष्णु बोडके, डॉ. रमा धर्माधिकारी, खडकेश्वर वाचनालयाच्या ग्रंथपाल समता लॉडे, शिशुविहार माध्यमिक शाश्रेच्या ग्रंथपाल स्मिता आगलावे, बलवंत वाचनालयाचे ग्रंथपाल भारत सुरवसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार राहणार आहेत. आहेत. याप्रसंगी याप्रसंगी ग्रंथालय चळवळीत काम करणारे मोहल्ला लायब्ररीचे संचालक मिझा अब्दुल कब्युम नदवी व ग्रंथ मित्र लक्ष्मण मोरे झयादींचा मान्यवरांच्या हस्ते साकार आयोजित करण्यात आलेला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
जि.प. स्थायी समितीची शुक्रवारी बैठक छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑगस्टची बैठक शुक्रवारी (दि. १४) होणार आहे. स्थायी समिती सभापती तथा जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता बैठकीस बैठकीस सुरुवात होईल, यासंबंधीच्या नोटिसा सर्व विषय समित्यांचे सभापती, सदस्य आणि खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. विषय पत्रिकेवर केवळ तीन विषय असल्याने समेत गेल्या महिन्यातील स्थायी समितीच्या बैठकीचे अनपालन आणि आयत्या वेळच्या विषयांवरच होण्याची शक्यता आहे.
मंडप वेलफेअर असोसिएशनची
वार्षिक सभा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलफेअर असोसिएशनची १२ वी वार्षिक सभा विमल लॉन्ग्या, बीडपास रोड येथे पार पडली. या समेत सभासदांच्या व्यवसा वसायाबद्दलच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एलईडी फोकस, साऊंड, मेंट, खुर्ची यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये मंडप, केटरिंग, इव्हेंट मालक व मंडप कामगारांनी सहभाग नोंदवला. १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑल टेन्ट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र प्रभारी विजयहि परदेशी, आशिष नेरळकर, गोविंद शुक्ला, अनिल कांबळे, केशव खिचडे, रखमाजी जाधव, जयराम टेकाळे यांनी मंडप व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष शर्मा, नरेश भल्ला, अग्रवाल कारपेट, स्वप्निल सिनकर, निलेश गावंडे, सय्यद सलीम, अमोल काकडे, सय्यद अदानी, कुलकर्णी, जगनाथ दाभाडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, सचिव परमेश्वर ठोंबरे, सहसचिव अशोक हिंदे, कोषाध्यक्ष गणेश समार्ट, सदस्य सचिन पठारे, प्रशांत उपलेंचवार, के. पी. सिंगारे, ह.भ.प. अर्जुन म.पांचाळ, प्रदीप राठोड, सुनील डवारे, बालाजी गाडीवान, महादेव कावळे, प्रसिद्धीप्रमुख शब्द काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ईश्वर शिंदे यांनी केलं तर सूझांचालन परमेश्वर ठोंबरे यांनी केले.
थायलंड ट्रिपची थाप मारून पालकमंत्र्यांच्या नावाने गंडा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने धायलंडला नेण्याची थाप मारून वृद्ध महिलेने ६ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शोमा उत्तम देववार (७०) देवकर (७०, रा. समतानगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आम्रपाली साहेबराव गाव (३७, रा. बीद्धनगर, जवाहर कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, जुलैमध्ये शोमा देवकर ही महिला उत्तमनगर, जवाहर कॉलनी भागात आली होती. तिने पढ़ौतील महिलांना एकत्र करून थायलंड, श्रीलंका आणि चावना या ठिकाणी जाण्याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यानंतर ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शोभा देवकर पुन्हा उत्तमनगर येथे आली. तेव्हा आम्रपाली यांच्यासह कलाबाई कदम, विमल सावते, दैवशाला कदम, विद्या कदम, उषा काळबांडे, राजनंदिनी परधने, पार्वती धुळे, वैशाली ढगे, संगीला परधने या महिलांनी आणि प्रशांत कदम व पवन परधने या दोन पुरुषांनी प्रलोकी ५०० रुपया स्पर्याप्रमाणे एकूण ६ हजार रुपये रोख रकम तिच्याकडे जमा केली. आपण तारखेला थायलंडला जाणार आहेत, असे सांगून तिने या सबंचेि आधार कार्डचे झेरॉक्स आणि पासपोर्ट साईका फोटोही गोळा केले,














